Sunday, January 18, 2026
HomeCrimeशासकीय रुग्णालयातून बाईक चोरी : शहर पोलिसांनी केली अटक

शासकीय रुग्णालयातून बाईक चोरी : शहर पोलिसांनी केली अटक

Bike theft from government hospital:           D B team of Chandrapur city police arrested at short time

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- शासकीय रुग्णालयात मित्राला जेवणाचा डब्बा पोहोचवण्यासाठी आलेल्या व्यक्तीची मोटर सायकल अज्ञात इसमाने चोरून नेली या चोरीचा तपास चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अल्पवधीत करीत बाईक चा शोध घेत बाईक जप्त करीत आरोपीला अटक केली आहे. Bike theft arrest

तालुक्यातील घुग्घृस येथील रविंद्र वानखेडे दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10-30 वाजताच्या दरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालय, चंद्रपुर येथे मित्राला जेवणाचा डब्या देणेकरीता आपली होडा शाईन कंपनीची काळया रंगाची मोटरसायकल क्र. एम 34 बि. एन. 3172 ही बाईक रूग्णालयाच्या डिलीवरी विभागासमोर लावली व डब्बा घेवुन परत आले असता सदर ठेवलेली मोसा दिसुन न आल्याने तिचा आजुबाजुच्या परीसरामध्ये शोष घेतला असता मिळुन न आल्याने त्या ठिकाणाहुन मोसा कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले यावरून वानखेडे यांनी दिनांक 14 जुलै रोजी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Chandrapur City Police Station

शहर पोलिसांनी तोंडी रिपोर्ट वरून अपराध कमांक. 587/024 कलम 303 (2) भा.न्या. स. गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

पोलिसांनी DB Scott तपासामध्ये मुखबीर दवारे खबर प्राप्त करून अतीशय अल्पशा कालावधी मध्ये आरोपी महेश वंसता बोरीवार, वय 40 वर्ष, रा. जलनगर वार्ड, चंद्रपुर यांना गुन्हयात अटक करून त्यांचे कडुन होडा शाईन कंपनीची काळया रंगाची मोटारसायकल क्र. एम 34 बि.एन. 3172 किंमत 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री सुधाकर यादव, चंद्रपूर शहर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरके मॅडम यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि संतोष निभॉरकर, सफौ विलास निकोडे, पोहवा महेंद्र बेसरकर, सचिन बोरकर, संतोष पंडीत, इम्रान खॉन, रूपेश पराते, संतोष कावळे, शाहाबाज सय्यद, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, इरशाद शेख, मंगेश मालेकर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular