Bicycle Rally on Bicycle Day celebrated on behalf of Legal Services Authority
चंद्रपूर :- जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वतीने सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले. World Cycle Day

दिनांक 2 जून जागतिक सायकल दिन निमित्ताने चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयाचे (प्रभारी) प्रमुख न्या. पी जी. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सचिव न्या. सुमित जोशी यांच्या नेतृत्वात सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.
सायकल रॅली ची सुरुवात सकाळी जिल्हा न्यायालयातून हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली दरम्यान बस स्टॉप, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, कस्तुरबा रोड मार्गे गांधी चौक ते परत जटपुरा गेट ते प्रारंभ स्थळ जिल्हा न्यायालय येथे रॅली ची सांगता करण्यात आली.
यावेळी न्यायालयीन न्यायाधीश, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, अधिवक्ता, डॉक्टर, विद्यार्थी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.