Bhumipujan of various development works in Rajura taluka by MLA Subhash Dhote
चंद्रपूर :- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या राजुरा तालुक्यातील विविध विकासकामांचे भुमिपुजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये राजुरा तालुक्यातील मौजा सोन्डो येथे नाली बांधकाम करणे १० लक्ष, मौजा देवाडा येथे आदिवासी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे बांधकाम करणे, १५ लक्ष, सिमेंट रोड व नालीचे बांधकाम करणे, १० लक्ष, मौजा येरगव्हाण येथे सिमेंट कॉंक्रेट रस्ता बांधकाम करणे, १५ लक्ष, मौजा भेंडवी येथे सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकाम करणे, १० लक्ष रुपये निधीच्या विकास कामांचा समावेश आहे.
या प्रसंगी देवाडा येथे चे सरपंच शंकर मडावी, उपसरपंच बोंकूर, अब्दुल जमीर, तिरुपती मेश्राम, चंद्रभान आडे, जगन दुर्गे, गजानन हरणधरे, सत्यपाल जाभोर, लालचंद करमनकर, जैतु कुडसंगे, मस्तु वेडमे, भिमराव किन्नाके, मारोती मेश्राम, केशव कुमरे, सोंडो येथे सरपंच जयराम आत्राम, उपसरपंच रामराव वडस्कर, भाऊजी वडस्कर, संजय साईनवार, अफसर सय्यद, ऋषी गेडाम, गुलाब झाडे, राहुल पांडव, इक्बाल सय्यद, नारायण झाडे, सुधाकर वडस्कर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.