Sunday, December 8, 2024
Homeआमदारआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मतदार संघातील 11 कोटी 13 लक्ष रुपयांच्या...
spot_img
spot_img

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मतदार संघातील 11 कोटी 13 लक्ष रुपयांच्या 51 कामाचे भुमिपूजन…

Bhumipujan of 51 works worth Rs 11 crore 13 lakh in the constituency by MLA Kishore Jorgewar

◆ ग्रामीण भागात उपलब्ध होणार मुलभुत सोयी सुविधा, 8 कोटी रुपयातून होणार पांदन रस्ते

चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाने 11 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामविकास २५\१५ निधीतून मंजूर या निधीतून मतदार संघातील 51 कामे करण्यात येणार आहे. यात जवळपास ८ कोटी रुपये पांदन रस्त्यासाठी खर्च केल्या जाणार आहे. या सर्व कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, ग्रामीण कामगार आघाडी यंग चांदा ब्रिगेडचे, रुपेश झाडे,चिंचाळा च्या सरपंचा शोभा चिमुरकर, ग्रामविकास अधिकारी सुधाकर वासेकर, खुटाळा सरपंच ऋतिका नरुले, उपसरपंच रोशन रामटेके, वेंडली सरपंचा प्रतिमा अलवलवार, उपसरपंच राजकुमार नागपुरे, पडोली सरपंच विक्की लाडसे, दाताळा सरपंच सुनीता देशकर, मोरवा सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदुरकर, म्हातारदेवी सरपंच संध्या पाटील, उपसरपंच शंकर उईके, पिपरी सरपंच वैशाली मातने, उपसरपंच हरिओम पटवले, सोनेगाव सरपंच संजीव उकीनकर, शेणगाव सरपंच सुष्मा मालेकर, ग्रामीण संघटक मुन्ना जोगी, छोटा नागपूर उपसरपंच ऋषभ दुपारे, गुड्डू सिंग, दाताळा माजी सरपंच रवी लोनगाडगे, साखरवाही सरपंच नागेश बोंडे, दिलीप चौधरी, अनिल नरुले, श्यामकांत थेरे, जय मिश्रा शहर संघटक विश्वजीत शहा, राशेद हुसेन, कार्तिक बुरेवार, कौरव जोरगेवार आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, मतदार संघाच्या विकासकामांसाठी आपण निधी कमी पडू दिलेला नाही. शक्य त्या सर्व विभागातून आपण मोठा निधी या भागाच्या विकासासाठी उपलब्ध करुन दिला आहे. नुकतेच ग्रामीण भागातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटावा याकरिता आपण 14 कोटी रुपये मंजुर करुन आनले आहे. या निधीतुन 10 गेटेड बंधारे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतीचा प्रश्न सुटणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण वेळोवेळी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र या गावांच्या सर्व समावेशक विकासासाठी मोठ्या निधीची गरज होती. यासाठी आपल्याला 11 कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करता आला आहे. या निधीतुन मतदार संघातील 10 गावातील 51 कामे आपण मार्गी काढले आहे. यात पांदन रस्ते, समाज भवन, व्यायामशाळा, रस्ता, नाली, सौदर्यीकरण यासह मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. शहराचा विकास गतीने होत असतांना मतदार संघातील ग्रामीण भाग दुर्लक्षीत राहू नये हा उदिष्ट आमचा राहिला आहे. याकरिता समान वाटप आपण केले आहे. गावात वाचनालय, समाज भवन उपलब्ध करुन देण्याच्या दिशेनेही आमचे प्रयत्न सुरु आहे. काही गावांमध्ये यासाठी आपण निधीही उपलब्ध करुन दिला असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ग्राम विकास निधी २५\१५ अंतर्गत मंजूर निधीतून दाताळा येथे 1 करोड 31 लक्ष रुपयांतून 5 विकासकामे केल्या जाणार आहे, नागाळा, चिंचाळा मार्गासाठी 20 लक्ष रुपये, नागाळा येथे समाज भवणासाठी 25 लक्ष रुपये, नागाळा – वांढरी ते मोरवा पर्यंतच्या पांदण रस्त्यासाठी 30 लक्ष रुपये, नागाळा येथील पांदण रस्त्यासाठी 11 लक्ष रुपये, वांढरी नागाळा या पांदण रस्त्यासाठी 28 लक्ष रुपये, चिंचाळा येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या सुरक्षाभिंतीसाठी 20 लक्ष रुपये, चिंचाळा येथील सिमेंट रोडच्या कामासाठी 30 लक्ष रुपये, खुटाळा येथील तुकडोजी महाराज यांच्या सभागृहासाठी 40 लक्ष, खुटाळा येथील सामाजिक भवनाच्या कामासाठी 25 लक्ष, मोरवा – चारगाव पांदण रस्त्यासाठी 30 लक्ष, मोरवा येथील समाज भवनासाठी 30 लक्ष, म्हातारदेवी येथील खडीकरणाच्या कामासाठी 30 लक्ष, म्हातारदेवी येथील सामाजिक भवनासाठी 41 लक्ष, पिपरी येथील समाज भवनाच्या कामासाठी 30 लक्ष रुपये, पिपरी – मारडा पांदण रस्त्याच्या खडीकरणासाठी 30 लक्ष रुपये, वेंडली येथील पांदण रस्त्यासाठी 30 लक्ष रुपये, सोनेगाव येथील पांदण रस्त्यासाठी 30 लक्ष रुपये, सोनेगाव अंतर्ला येथील पांदण रस्त्सासाठी 28 लक्ष रुपये, सोनेगाव येथील व्यायाम शाळेसाठी 20 लक्ष रुपये, शेणगाव ते साखरवाही पांदण रस्तासाठी 28 लक्ष रुपये, शेणगाव येथील समाज भवनाच्या कामासाठी 45 लक्ष रुपये असा निधी मंजुर करण्यात आला आहे. यासह ईतर कामेही 11 कोटी रुपयांच्या निधीतुन केल्या जाणार आहे. इंदिरानगर येथील लोहार समाजाच्या समाज भवनासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून सदर कामाचेही यावेळी भूमिपूजन झाले या सर्व कामांच्या भुमिपूजन कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular