Saturday, April 26, 2025
Homeधार्मिकबुध्द विहार बांधकामास 3 लाख 55 हजार रुपये दान ; स्लाप चे...

बुध्द विहार बांधकामास 3 लाख 55 हजार रुपये दान ; स्लाप चे भुमी पुजन संपन्न

Bhumi Pujan of 3 lakh 55 thousand rupees was completed for the construction of Buddha Vihar

चंद्रपूर :- घुग्घुस येथील भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस, चा अनुषंगाने पंचशील चौक येथे नवनिर्मित बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू आहे. भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे यांनी आखलेली संकल्पना कि आपण तिसरा दिवस, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असा अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपण व्यर्थ पैसा खर्च करतो. हा पैसा समाजाला दान दिला तर योग्य वापर करून समाजातील आपण कार्य करु शकतो. ह्या उद्देशाने अनेक समाजातील बांधवानी दान दिले.

कवडु लटारुजी रामटेके यांनी आपल्या आई वडीलाचा स्मुर्ती प्रीत्यर्थ – तुळसाबाई लटारुजी रामटेके, लटारुजी सखाराम रामटेके यांच्या प्रीत्यर्थ 2 लाख 50 हजार रुपये दान दिले. या अगोदर कवडुजी रामटेके यांनी 1 लाख 5 हजार दान दिले होते.

कवडुजी रामटेके यांनी छोटे मोठे कार्यक्रम हे समाजाचे होत असतात. आणि पाऊस अवकाळी पावसामुळे समाज बांधवांना त्याच्या नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून विहाराचा जागेवर आपण एक खुला स्लाप टाकला तर पाऊस आला वारा आला तर आपल्याला काहिच फरक पडणार नाही. आणि डेकोरेशन पेंडाल चा सुद्धा खर्च वाचेल हा विचार लक्षात घेता कवडुजी रामटेके यांनी अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव हेमंत आनंदराव पाझारे चंदगुप्त घागरगुंडे यांना फोन व्दारे विचारले कि या स्लाप ला किती रुपये खर्च येऊ शकतो. सुरेश मल्हारी पाईकराव हेमंत आनंदराव पाझारे चंदगुप्त घागरगुंडे यांनी ठेकेदारास एक बचट विचारुन कवडुजी रामटेके यांना सांगितला. त्यांनी लगेच होकार दर्शविला.
2 लाख 50 हजार रुपये ओपन स्लाप त्यांचा आई वडील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दान दिले. आज दिनांक 09 मार्च 2024 रोजी त्या ओपन स्लाप चे भुमी पुजन करण्यात आले आहे

कवडुजी रामटेके हे भारतीय महसूल सेवा मध्ये अप्पर आयुक्त म्हणून सेवा दिले होती. त्यांचे लहानपण हे घुग्घुस मध्ये खुप वाईट परिस्थिती असल्यामुळे त्यांना डोक्यावर टोपली घेऊन भाजी पाला सुध्दा विकायचे तर कधी कुणाला चहा सुद्धा नेऊन द्यायचे अथांग संकटातून त्यांनी परिश्रम अभ्यास करून ते शिकले व येथील पहिले additional commissioner बनले.

समाजाची चळवळ बाबासाहेबांचे विचार हे घरो घरी पोहचले पाहिजे आणि समाजातील मुल हे घडले पाहिजे याच उद्देशाने व्यर्थ पैसा खर्च न करता सर्व समाजातील लोकांनी हा चांगला उपक्रम आहे हा आपण अनुसरलो पाहिजे. आणि समाजाला दान केले पाहिजे.
यावेळेस अध्यक्ष – सुरेश मल्हारी पाईकराव कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर उपाध्यक्षा प्रतिभाताई कांबळे संभाजी पाटील दिगांबर बुरड जयंत निखाडे नामदेव फुलकर लक्ष्मण टिपले रवी देशकर बबन वाघमारे विजय कवाडे उत्तर उमरे शोभाबाई पाईकराव पल्लवीताई सोदारी साठेताई, व समस बौद्ध बांधव उपस्थित होते

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular