Bhola tiger, which killed three people, was jailed by the forest department
चंद्रपूर :- ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रात 3 जणांचा बळी घेणाऱ्या Tiger Attack वाघाला जे्रबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले असून जेरबंद करण्यात आलेला वाघ हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पतील Tadoba Tiger Reserve Forest Project भोला नावाचा वाघ असल्याचे निष्पन्न झाले आहे. Bhola Tiger
तीन जणांचे बळी घेणाऱ्या हिंसक वाघाला जेरबंद करण्याच्या अनुषंगाने वन विभाग या वाघाचा शोध घेत होते. अखेर या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. चिमूर तालुक्यातील निमढेला परिसरात डार्ट मारून रेस्क्यू टीमने या वाघाला जेरबंद केले आहे.
भोलाच्या हल्ल्यात 15 मे बुधवारी एका 35 वर्षीय शेतकऱ्याचा जीव गेला होता. तर या आधी त्याच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
भोला हा भानुसखिंडी Bhanuskhindi आणि छोटा मटका Chhota Matka Tiger यांचा बछडा असून भोला पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात तिघांचा नाहक बळी गेल्याने या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. परिणामी, आज अखेर त्याला जेरबंद करण्यात आले असून या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला Rescue Center रवाना करण्यात आले आहे.