
Ban illegal business, theft, burglary in Ballarpur; Demand of Aam Aadmi Party Ballarpur चंद्रपूर :- बल्लारपूर शहर व तालुका परिसरात जुगार, मटका, अवैध दारू, सुगंधित तंबाकू विक्री, रेती तस्करी तसेच घरफोडी व चोरी च्या गुन्ह्यांची प्रकरणे खुप वाढली आहेत यावर निर्बंध घालावा अश्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी बल्लारपूर व बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना आम आदमी पार्टी बल्लारपूर च्या वतीने देण्यात आले.
दिनांक 12 ऑक्टोबर गुरुवार रोजी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहर व तालुका परिसरात जुगार, मटका, अवैध दारू, सुगंधित तंबाकू विक्री, रेती तस्करी.Gambling, Matka, Illegal Liquor, Sale of Aromatic Tobacco, Sand Smuggling असे प्रकारच्या विषयांना घेऊन बल्लारपुर पोलिस निरीक्षकांना व उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली की अवैध धंदे दिवसाढवळ्या सर्रासपणे सुरू आहेत व सदर अवैध धंद्यांमुळे अनेक गोरगरिबांची घरे उध्वस्त झाली आहेत तरी या अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालून गोरगरीब जनतेला न्याय द्यावे.
यासोबतच शहरात घरफोडी व चोरी प्रकरणे खुप वाढली आहेत. यामुळे शहरातील जनता फार अस्वस्थ आहे. पुलीस प्रशासनानी ठरवले तर दोन दिवसात हे सर्व अवैद्य धंदे बंद होऊ शकते पण या गंभीर विषयावर दुर्लक्ष हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे, तरी आपण चोरी व घरफोडी पासून सुरक्षा करण्यासाठी उपाययोजना करावी, सध्या भेटलेल्या चोरांवर कडक कारवाई करुन, चोरांकडुन मालमत्ता जप्त करून पीडित परिवाराची भरपाई करण्यात येणार असे आश्वासन पोलिस निरीक्षक व SDM मॅडम यांनी आश्वासन दिले. Ban illegal business, theft, burglary in Ballarpur; Demand of Aam Aadmi Party Ballarpur
यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफ़ज़ल अली, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सचिव ज्योतिताई बाबरे, सहसचिव आशीष गेड़ाम, प्रवक्ता आसिफ हुसैन शेख, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, सहसंघठन मंत्री बेबिताई बुरड़कर, मिडिया प्रमुख सौरभ चौहान, रेखाताई भोगे, प्रज्योत डांगे इत्यादी उपस्थित होते.