Ballarpur petrol bomb attack accused arrested
चंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर येथील एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने दिनांक 7 जुलै 2024 रोजी पेट्रोल बॉम्ब च्या साहाय्याने हल्ला करण्यात आला होता. हल्ला करून आरोपी पळून गेले होते. petrol bomb attack
सदर घटनेचा पोलीस स्टेशन बल्लारशा जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. Chandrapur Crime
सदर घटनेचे गांभिर्य ओळखुन पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारशा पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. Chandrapur District Police
तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने LCB दोन आरोपींना जबलपूर राज्य मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन, सदर आरोपी हे जबलपूर येथिल कुख्यात गॅग स्टार असुन त्यांचे वर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच उर्वरित दोन आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशन बल्लारशा यांचे मार्फतीने अटक करण्यात आले आहे. Ballarpur Police Station
पुढील तपास बल्लारशा पोलीस स्टेशन करित आहेत.