Saturday, April 20, 2024
HomeLoksabha Electionचंद्रपुरात होणार बाळासाहेब आंबेडकर यांची सभा व रॅली

चंद्रपुरात होणार बाळासाहेब आंबेडकर यांची सभा व रॅली

Balasaheb Ambedkar’s vba candidate Rajesh Belle’s campaign meeting and rally to be held in Chandrapur

चंद्रपूर :- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आणि प्रचार रॅली चंद्रपुरात आयोजित करण्यासंदर्भात नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली.

आज दिनांक ३१ मार्च रोजी रविवारला चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघ वंचित बहुजन आघाडीचे आधिकृत उमेदवार श्री राजेश वारलूजी बेले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची नागपूर येथे भेट घेतली व लोकसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतला. नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौरा नियोजन आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासासाठी नवीन पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे मतदार बघत आहे. पुढील काही दिवसातच बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आणि रॅली आयोजित करण्यात येणार आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular