Thursday, February 22, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनपारंपरिक घुसाडी दंडारीतून घडले आदिवासी संस्कृती, लोककलेचे दर्शन : रंजन लांडे :...

पारंपरिक घुसाडी दंडारीतून घडले आदिवासी संस्कृती, लोककलेचे दर्शन : रंजन लांडे : सोनापूर येथे आदिवासी बांधवांचे बहारदार घुसाडी दंडारीचे आयोजन.

Bahardar Ghusadi Dandari organized by tribal brothers in Sonapur

चंद्रपूर :- पारंपरिक घुसाडी दंडारीतून आदिवासी संस्कृती आणि लोककलेचे सत्यम शिवम आणि सुंदरम असे दर्शन घडते. आदिम आदिवासी बांधवांच्या कलात्मक सौंदर्याचे हे संजीवन चित्रण प्रदिर्घ काळ मनात घर करून राहते, अशी प्रतिक्रिया राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी दिली. ते सोनापूर येथे सरपंच जंगु पाटील येडमे व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित घुसाडी दंडार या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्त्य संस्कृती कितीही घुसखोरी करीत असली तरी राजुरा सारख्या आदिवासी बहुल क्षेत्रात आदिवासी समाज अजूनही आपली संस्कृती टिकवून आहे. दस-यापासून दिवाळीपर्यंत चालणारे घुसाडी दंडार नृत्य हा त्या परंपरेचाच एक भाग आहे. महाराष्ट-आंध्र सीमेवरील राजुरा तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. संगणक युगातही आदिवासी बांधव आपली संस्कृती, परंपरा कायम जपून आहेत. घुसाडी दंडार नृत्य हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव विविध कलागुणांनी, लोककलांनी समृद्ध पारंपरिक नृत्यांनी ते हा उत्सव साजरा करतात. यात दस-याच्या दिवसापासून आदिवासी बांधव देवदेवतांना साक्षी ठेवून पारंपरिक पोषाख परिधान करतात. मोराच्या पिसांचा टोप डोक्यात घालून जवळपास १५ ते २० लोककलावंत असलेले आदिवासी बांधव घुसाडी दंडार नृत्यासाठी सज्ज असतात. त्यातील एकास प्रमुख मानून त्याला घुसाडी ही उपमा देण्यात येते. आणि अतिशय लोकप्रिय व तितकीच कलात्मक बहारदार अशी ही रचना सादर केल्या जाते.

या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, आत्माचे अध्यक्ष व कृ. उ. बा. स. संचालक तिरुपती इंदूरवार, सोनापूरचे सरपंच जंगु पाटील येडमे, राजुरा वि. यु. काँ. अध्यक्ष उमेश शंकर गोनेलवार, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular