Awareness Rally of New Laws by Ramnagar Police Station
चंद्रपूर :- भारतीय दंड संहिता कायदा ऐवजी भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कायदा केंद्र सरकारने लागू केल्याबद्दल रामनगर पोलीस ठाणे Ramnagar Police Station च्या वतीने भवानजीभाई चव्हाण शाळेमधून जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले. Awareness Rally of New Laws
केंद्र सरकारने दिनांक 1 जुलै पासून 3 नवीन फौजदारी कायदे देशभरात लागू केले या कायद्यांबाबत जनमाणसांत जनजागृती व्हावी याकरिता दिनांक 1 जुलै रोजी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात नवीन फौजदारी कायद्यांची रामनगर पोलीस ठाणे तर्फे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला यात भवानजीभाई चव्हाण विद्यालयाच्या विध्यार्थ्यांना घेऊन शाळेपासून सावरकर चौक, बस स्टॉप चौक प्रियंदर्शनी चौक ते जटपुरा गेट ते परत प्रियंदर्शनी चौकात जनजागृती रॅली चे समारोप करण्यात आले.
या जनजागृती रॅलीत प्रामुख्याने अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, सुनील गाडे पोलीस निरीक्षक रामनगर, प्रवीणकुमार पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा, रोशन यादव पोलीस निरीक्षक सायबर क्राईम, श्री नवघरे पो.नि. राखीव पोलीस, पोलीस अंमलदार व भवानजीभाई चव्हाण विद्यालयाचे शिक्षकवृंद, एनसीसी कॅडेट्स, विद्यार्थी व विध्यार्थिनी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.