Auto driver is the backbone of the city’s transport system – MLA Kishore Jorgewar
Organized auto driver-owners meet on behalf of Young Chanda Brigade
चंद्रपूर :- आपल्या मनातील अडचणी, चिंता, आणि अपेक्षा एकत्र येऊन मांडणे, तसेच एकमेकांशी संवाद साधून समस्यांचे निराकरण करणे हा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित आजच्या या स्नेहमिलन कार्यक्रमचा उद्देश आहे. ऑटो चालक-मालक हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या समस्या सोडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Auto driver is the backbone of the city’s transport
यंग चांदा ब्रिगेडच्या Young Chanda Brigade वतीने पोलिस सभागृह येथे आटो चालक-मालकांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ. जोरगेवार बोलत होते. यावेळी आटो संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, ऑटो संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम शिंदे, जफर शेख, उपाध्यक्ष मधुकर राऊत, असलम खान समाजसेवक विनोद रेब्बावार, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे यूथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, दत्तू गवळी, मंगेश अहिरकर, सतनाम सिंह मिरधा, कार्तिक बोरेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. auto driver-owners meet on behalf of Young Chanda Brigade
पुढे बोलताना आ. जोरगेवार MLA Kishor Jorgewar म्हणाले की, “ऑटो चालक-मालकांच्या कष्टामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येतो. आपण रोजच्या जीवनात अनगिनत अडचणींना सामोरे जात आहात. ट्रॅफिक समस्या, वाढती इंधन दर, वाहनांचे देखभाल खर्च, आणि अन्य आर्थिक अडचणींवर मात करत आपण आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करता. आपले हे कार्य सेवेचे आहे, त्यामुळे आपले योगदान समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.”
“ऑटो चालकांमध्ये सेवेची भावना आहे. उन्हाळ्यात आपण आटोवर फिरती पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात ऑटो चालकांनी सहकार्य करून नागरिकांना ही सेवा निशुल्क दिली. म्हाडामध्ये ऑटो चालक-मालकांना घर घेण्याची सवलत देण्यात आली आहे. यात ऑटो चालक-मालकांनी पुढे येऊन याचा लाभ घ्यावा आणि यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासनही आ. जोरगेवार यांनी दिले.”
“आजच्या या कार्यक्रमात आपण सर्व एकत्र येऊन आपल्या व्यवसायातील समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याच्या दिशने प्रयत्न करा असेही यावेळी ते म्हणाले. आपल्यामध्ये कायम स्नेहभाव आणि एकोपा टिकून राहावा,” असे आवाहनही आ. जोरगेवार यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला शेकडो ऑटो चालक – मालक यांची उपस्थिती होती.