Asifaraja Shaikh assumed charge as the newly elected Police Inspector of Ballarpur Police Station
● बल्लारपूर चे तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची नागपूर ग्रामीण येथे बदली
चंद्रपूर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुर जिल्हयात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत,यातच बल्लारशाह शहराचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली झाली असून आता आसिफ रजा यांनी बल्लारशाह पोलीस निरीक्षक चा पदभार सांभाळला आहे. घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये वर्षभरा पूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून आसिफ रजा नियुक्त करण्यात आली होती, त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नियंत्रणात ठेवली होती त्यांची ओळख हि एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून होती. Ballarpur Police Station
बल्लारपूर शहरात अनेक अवैध धंदे सर्रासपणे चालतात, विशेष म्हणजे सुगंधित तंबाखू, कोळसा, वाळू तस्करी हे सगळ होत आहे. सुगंधित तंबाखू माफियाचा बल्लारपूर हा मोठा हब आहे, या ठिकाणाहून जिल्ह्यातील विविध भागात तंबाखूची तस्करी केल्या जाते, मात्र तंबाखू माफियावर कोणाचा आशीर्वाद आहे हे सध्या पडद्यात असतांना त्यांच्यावर आजपर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही.
आता पोलीस निरीक्षक रजा या मोठ्या तस्करीवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.