Arya Vaishya community will not tolerate inclusion in OBC – Ravindra Tonge
चंद्रपुर :- ओबीसीची वाढीव आरक्षणाची जातनिहाय जनगणना न करता छुप्या मार्गाने मराठा समाजानंतर आता कोमटी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचा सरकारचा डाव दिसून येत आहेत. सरकार ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम करत आहेत. हे ओबीसींवर अन्याय करणारे आहे. ते मूळ ओबीसी कदापीही सहन करणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी विध्यार्थी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी शासनाला दिला आहे. National Federation of OBC Students याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
कोमटी समाज सामाजिकदृष्ट्या मागास ठरत नसून तो उच्चवर्णात येतो. कोमटी समाजातील लोक सावकार असून सावकारी व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेले आहेत. हा समाज राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहेत. मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ओबीसीमध्ये एखाद्या समाजाचा समावेश करायचा झाल्यास तो समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असला पाहिजे किंवा त्या समाजाचे मागासलेपण शैक्षणिक-सामाजिक कसोट्यावर सिद्ध झाले पाहिजे, ही मुख्य अट आहे.
सरकारने कोमटी समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना अक्षय येरगुडे, वैभव क्षीरसागर, प्रशांत पिपलशेंडे, हर्षल कोटे, आ अनिकेत पिपलशेंडे, स्नेहल चौथाले, मनीषा बोबडे आदी उपस्थित होते.