Sunday, December 8, 2024
HomeCrimeराष्ट्रपीता महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा
spot_img
spot_img

राष्ट्रपीता महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा

Arrest the sociopath who vandalized the statue of Mahatma Phule

चंद्रपूर :- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले Mahatma Jyotiba Fule यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुतळ्याला शाई फेकून विटंबणा करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा अशी मागणी वकील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. Advocate Group

यवतमाळ येथील महात्मा फुले चौकात असलेल्या महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याच्या पाठीवर शाई फेकून विटंबना अज्ञात समाजकंटकांकडून करण्यात आली. याचे पडसाद राज्यभर उमटले असून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. 

आज दिनांक 29 एप्रिल रोजी चंद्रपूरातील वकीलांच्या समूहाने या घटनेचा निषेध नोंदवत फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचाराला थारा देणारी ही घटना घडली असून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा कट आखला जात आहे का असा प्रश्न फुले, शाहू ,आंबेडकर अनुयायींना पडला आहे. आजही फुल्यांच्या विचारसरणीला पुढे येवून लढण्याची ताकद नसल्याने असे विभस्य कृत्य करून सामाजीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटक करीत आहे असल्याचा आरोप केला आहे. समाजात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोकांत विष पसरण्याचं कटकारस्थान महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. सदर घटनेचा निषेध नोंदवत, अश्या विकृत समाजकंटकाला तातडीने अटक करण्यात यावी आणि महात्मा फुलेंच्या विचारांना शतशः नमन करतो अश्या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सादर करण्यात आले.

यावेळी ॲड. निमेश मानकर, ॲड. अतुल बांभोरे, ॲड.सुहास कांबळे, ॲड. सुधीर पेंदोर, ॲड. रोशनी कांबळे आदीं वकील बांधवांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular