Anutai Dahegaonkar’s request to MP Pratibha Dhanorkar for Congress candidature of Chandrapur Assembly
चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठी राखीव आहे. काँगेसच्या ज्येष्ठ नेत्या अनुताई दहेगावकर यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून महिलांसाठी उमेदवारी देण्यात यावी याकरिता चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची त्यांची चंद्रपूर स्थित कार्यालयात महिला कार्यकर्त्यांसह भेट घेऊन चंद्रपूर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी करिता मागणी केली. Chandrapur Assembly Constituency for Congress
मागील कित्येक वर्षांपासून मी काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे कार्यरत असून, पक्षाने सोपवलेले विविध कार्य योग्यरित्या पूर्ण केले असून, पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णतःवस नेली आहे, विविध सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेतलेला आहे. काँग्रेस पक्षातील मोठा महिला वर्ग आपल्या पाठीशी असल्याचीही मनमोकळी चर्चा यावेळी दहेगावकर यांनी खासदार धानोरकर यांच्याशी केली.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारीची मागणी करतांना अनुताई दहेगावकर यांच्या सोबत छायाताई शेंडे, रेखा बारसागडे, वंदना वाघमारे, शालिनीताई लाडे, कुंदा गोवर्धन, पुष्पा गोंडाणे, विना उपरे, वनिता कुरवाडकर, सुवर्णा खोब्रागडे, अनिता दातार, लता पेंदाम, लिला जुमडे, लता खोब्रागडे, संमुदरा बोरकर, कपिलाताई मेश्राम, वनिता भागवत, छायाताई वानखडे, वंदना बांबोळे, वंदना भागवत रिना रायपुरे, इंदू महंत आदी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्ता उपस्थित होत्या.