Anutai Dahegaonkar distributed sherbet on behalf of Snehabandh Charitable Trust for Muharram devotees
चंद्रपूर :- मोहरम Moharam Festival निम्मित चंद्रपूर कारागृहातिल हजरत मखदुम उर्फ गैरीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनुताई दहेगावकर यांनी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शरबत वितरण केले. Congress Women’s Front
हजरत हुसेन रजी हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दहावीला चंद्रपुरातील कारागृहात असलेल्या हजरत मखदुम उर्फ गैरीशाह वली यांचा दर्गा सर्व सामान्य जनतेसाठी खुला करण्यात येतो.
मोहरमच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यानिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शरबत वाटप करण्याचे काम स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनुताई दहेगावकर यांनी केले.
शरबत वाटप करतांना त्यांच्या सोबत स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या छायाताई शेंडे, रेखा बारसागडे, वंदना वाघमारे, शालिनीताई लाडे, कुंदा गोवर्धन, पुष्पा गोंडाणे, विना उपरे, वनिता कुरवाडकर, सुवर्णा खोब्रागडे, अनिता दातार, लता पेंदाम, लिला जुमडे, लता खोब्रागडे, संमुदरा बोरकर, कपिलाताई मेश्राम, वनिता भागवत, छायाताई वानखडे, वंदना बांबोळे, वंदना भागवत, रिना रायपुरे आदी महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.