ancient Hanuman Temple in Civil Line Chowk, Cleanliness campaign implemented by Dr. Ashok Jeevtode
चंद्रपूर :- दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा Prabhu Sri Ramachandra idol in Ayodhya होत असून या महासोहळ्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील सर्व मंदीरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी केले असल्याने दि. १६ जानेवारी रोजी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी चंद्रपूर शहरातील सिव्हील लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदीरात स्वच्छता मोहीम राबवून प्रार्थना व पुजा अर्चना केली.

या स्वच्छता मोहीमेमध्ये डॉ. अशोक जीवतोडे Dr. Ashok Jivatode यांचेसह या परिसरातील दादा दहेकर, मनोहर गाठे, राजेंद्र डारलिंगे, सचिन दिघाडे, प्रवीण दिघाडे, नितीन कुकडे, प्रकाश गाठे, शामराव बदकुलवार, मधुकर हिरादेवे, सतीश शाहू, सतीश बिजेवार, गोपाळ वाटेकर, अनिल काळे, प्रवीण साखरकर, डॉ. आशीष महातळे, रवि देवाळकर, किशोर ठाकरे, रविकांत वरारकर, प्रविण जोगी, पीयुष मेश्राम, रवि जोगी, महेश यार्दी, जितेंद्र केराम, आदी व परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. Enthusiastic participation of citizens
यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांनी उपस्थितांना शहारातील विविध मंदीर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन केले.