Sunday, March 23, 2025
Homeआरोग्यश्रद्धेय बाबा आमटे यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

श्रद्धेय बाबा आमटे यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Anand Niketan Agricultural College organized a blood donation camp on the occasion of Baba Amte’s memorial day

चंद्रपूर :- आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना व कस्तुरबा रक्तपेढी सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी आनंदवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराची सुरुवात उद्घाटनपर कार्यक्रमाने झाली.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कस्तुरबा ब्लड बँकेंचे प्रमुख डॉ.हिमांशी जैन, डॉ. पोळ, विश्वस्त, म.से.स., श्री.सुधाकर कडू गुरुजी विश्वस्त म.से.स. तसेच डॉ सुहास पोतदार(प्राचार्य,आनंद निकेतन कृषी महाविद्यालय) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना श्रद्धेय बाबांच्या समाजसेवी कार्याबद्दल माहिती सांगून बाबांनी दिलेला सेवेचा वारसा आपण एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून पुढे चालविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांना रक्तदानाबद्दल मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.

शिबिरात एकुण 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अंजली तितिरमारे हिने केले. सदर रक्तदान शिबिराकरिता कस्तुरबा रक्तपेढी सेवाग्राम टीम तसेच सीतारतन व साईबाबा हॉस्पिटल आनंदवन यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वितेकरिता डॉ. मनोज जोगी, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, रासेयो समिती सदस्य शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular