Sunday, April 21, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनअनैशा वाहन चालक संघटनेने केली जिजामाता बालगृहात भाऊबीज, दिवाळी साजरी

अनैशा वाहन चालक संघटनेने केली जिजामाता बालगृहात भाऊबीज, दिवाळी साजरी

Anaisha Vehicle Drivers Association organized Bhaubij, Diwali celebrations at Jijamata Children’s Home.                                               चंद्रपूर :- दर दिपावलीला वेगवेगळे उपक्रम राबवित सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे अनैशा वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांच्या पुढाकाराने जिजामाता बालगृह गडचांदूर येथे भाऊबीज दिवाळी साजरी करण्यात आली.

जिजामाता बालगृह गडचांदूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील अनाथ मुलींचे मुलींचे एकमेव सेंटर आहे. संबंधित कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्यातील अनाथ आणि नाबालिक मुलींना या संगोपनासाठी केंद्रांत संगोपनासाठी पाठविण्यात येत असतात.

वार्डन- नयीन अंसारी आणि वार्डन कविता मेश्राम यांच्या देखरेखीखाली तमन्ना अली, समिक्षा घोटेकर, पायल मट्टे, आंचल मट्टे, रक्षंदा डाकरे, पल्लवी टेंभुर्णे, प्रतिमा खिरटकर, कुसूम कोसरिया, श्रद्धा येरमे, दिक्षा कुचनकर, पुर्वी घरोटे इत्यादी बालिकांनी अनैशा वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष भुषणभाऊ फुसे व यांचे सहकारी आशीष नामवाड व रिपब्लिकन जागृती अभियानचे प्रचारक अशोककुमार उमरे यांना सुद्धा सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाचारण केले. Anaisha Vehicle Drivers Association organized Bhaubij, Diwali celebrations at Jijamata Children’s Home

वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी कमलेश राऊत, हनुमंत कुसळे, उमाकांत वाघमारे, सत्यपाल गौरकार, राहुल मुक्कावार, कृपाशंकर उपाध्याय, महेंद्र ठाकूर इत्यादींचे औक्षण करून भाऊबीज दिवाळी साजरी करण्यात आली. संघटनेच्या वतीने ओवाळणी म्हणून मिठाई, दुपट्टा, पेन इत्यादी वस्तू भेट देण्यात आली.

औक्षण कार्यक्रमानंतर सहभोजन घेऊन व दिपावली आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन समारोप करण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular