Thursday, February 22, 2024
HomeBudget२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असलेला अर्थसंकल्‍प - ना. सुधीर...

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असलेला अर्थसंकल्‍प – ना. सुधीर मुनगंटीवार

An Economic Vision to Develop India by 2047 through Budget – Sudhir Mungantiwar

चंद्रपूर :- आज देशाच्‍या अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्‍प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असणा-या योजना ही या अर्थसंकल्‍पाची विशेषता आहे.

मागील १० वर्षात देशाच्‍या सर्व घटकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी PM Narendra Modi अनेक योजना चालविल्‍या, ज्‍यामुळे गरीब, तरूण, महिला, शेतकरी, दिव्‍यांग यांच्‍या जिवनात आमुलाग्र बदल झाला आहे.

या अर्थसंकल्‍पात पुढील ५ वर्षात गरीबांसाठी २ कोटी घरे बांधल्‍या जातील तसेच मध्‍यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे. रूफटॉप सोलर प्‍लॅन अंतर्गत १ कोटी घरांना ३०० युनिट दर महिन्‍याला मोफत मिळणार आहे.

याशिवाय कृषी, रेल्‍वे, स्‍कील इंडिया, महिला, युवा या सगळयांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्‍यात आली. मी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांचे या उत्‍तम अर्थसंकल्‍पाबद्दल अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular