Alert: Eirai dam gates will be opened
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- चंद्रपुर जिल्हात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील Irai Dam पाण्याची पातळी सतत वाढत असून दिनांक 19 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजता 205.750 मी. इतकी गाठलेली असल्यामुळे इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. >> सतर्कतेचा इशारा
त्यामुळे पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपुर, माना आणि इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या रहमत नगर, नगीनाबाग भागातील सर्व नागरीकांनी स्वतः नदीच्या पात्रापासून दूर राहावे तसेच आपली जनावरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी असा सावधानतेचा ईशारा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपुर च्या वतीने देण्यात आला आहे.
तसेच, इरई धरणाच्या क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धरणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले असल्याचीही माहिती प्रसारित करण्यात आली आहे. CSTPS and MNC administration alert alert: Eirai dam gates to open
तसेच चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ईराई नदि पात्राजवळील रहेमत नगर, बिनबा वार्ड, नगीनाबाग या भागात मनपा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.