Agriculture College gave lessons on soil conservation; Activities organized on the occasion of World Soil Day
चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा च्या वतीने दिनांक ५ डिसेंबर या जागतिक मृदा दिनानिमित्त महाविद्यालयात विदयार्थ्यां करिता मृदा हाच जीवनाचा आधार या विषयावर परिसंवादा चे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये मातीचे आरोग्य, माती परीक्षण , सेंद्रिय खतांचा वापर याबद्दल सखोल मार्गदर्शन डॉ सुहास पोद्दार प्राचार्य आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, डॉ. मनोज जोगी, रासोयो अधिकारी, श्री सुशील वाघ सहाय्यक प्राध्यापक मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग आणि श्री गोरे टेरिटरी मॅनेजर एफएमसी कंपनी यांनी केले. Agriculture College gave lessons on soil conservation; Activities organized on the occasion of World Soil Day
तसेच महाविद्यालय व एफएमसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील कोसरसार येथे जागतिक मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास पोद्दार , श्री सुशील वाघ सहाय्यक प्राध्यापक मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग तसेच एफएमसी कंपनीचे टेरिटरी मॅनेजर श्री गोरे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. सुहास पोद्दार यांनी माती परीक्षणाचे महत्त्व , सेंद्रिय खतांचा योग्य वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर , जमिनीची निगा कशी राखावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच माती परीक्षणाबद्दल श्री सुशील वाघ यांनी तर श्री गोरे यांनी जमिनीचे आरोग्य या बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर माती नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .
या कार्यक्रमाला लबान सराड फार्मर प्रोडूसर कंपनी चे पदाधिकारी, सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.