Thursday, February 22, 2024
Homeउद्योगफेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून कामगारांचे आंदोलन; आम् आदमी पक्षाचा पाठिंबा

फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून कामगारांचे आंदोलन; आम् आदमी पक्षाचा पाठिंबा

Agitation of workers by climbing over the boilers of the Ferro Alloy Plant;  Support of Aam Aadmi Party

चंद्रपूर :- चंद्रपूर – मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमधील मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक एस १ ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही.

त्यामुळे एस-१ वेतनश्रेणी लागू व्हावी, यासाठी सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांनी कामगारांसह फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दर्शविला असून, पदाधिकारी उपस्थित होते.

स्थायी कामगारांना एस-१ ग्रेड वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी कामगारांनी लढा उभारला होता. न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे. मात्र, फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापन कामगारांना सुधारित वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे.

त्यामुळे सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात सहसचिव माणिक सोयाम, कोषाध्यक्ष महादेव चिकटे, संघटक हेमलाल साहू, विनोद झामरे, मुसाफिर चौहान यांनी प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले.

यावेळी आम् आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा अध्यक्ष राजू कूडे, युवा महानगर अध्यक्ष संतोष बोपचे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, जयदेव देवगडे, शकर सरदार, पवन प्रसाद, दिपक बेरशेट्टीवार, योगेश मुरहेकर, अनुप तेलतुंबडे,  सिकंदर सागोरे,  सुनील सदभय्या, जितेंद्र कुमार भाटिया  इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular