Thursday, February 22, 2024
Homeग्रामपंचायतबीआरएस उमेदवारांचे थेट स्टॅम्प पेपरवरच शपथपत्र

बीआरएस उमेदवारांचे थेट स्टॅम्प पेपरवरच शपथपत्र

Affidavit of BRS candidates directly on stamp paper ; Political                                                                  चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे.रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात त्यांनी सांगितलं आहे.बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जात आहे. फुसे यांनी थेट विकासाच्या मुद्द्याला हात घातल्याने प्रस्थापितांची कोंडी झाली आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्र आजही मागासलेलं आहे. जीवती, गोंडपीपरी, कोरपणा, राजुरा तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही.या चार तालुक्यात अनेक प्रश्न आजही उभे आहेत. या क्षेत्रातील आमदारांचे विकासा बाबत कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेत रोष बघायला मिळते. अश्यात जिल्हात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केली. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला चेहरा भूषण फुसे यांच्याकडे धुरा आली. अल्पवधित बीआरएसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विश्वास जिंकला.तेलंगनाला लागून असलेला या भागात ” अब की बार, किसान सरकार ” नारा गुंजू लागला.

विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुका Grampanchayat Election होत आहेत.या निवडणूकित बीआरएसच्या उमेदवाराची कृती लक्षवेधक ठरली आहे.रामपूर ग्रामपंचायतीत बीआरएसने उमेदवार उभे केले आहे. या उमेदवारानी गावासाठी काय करणार ? हे थेट स्टॅम्प पेपरवर शपथ पत्रच लिहून दिला आहे.सरिता रायपोचम काटन, ज्योती नळे,माधुरी आंबेकर,विजय हजारे,कपिल धेटे,रामपोचम काटम या उमेदवारानी शपथ पत्र लिहिलं. या शपथ पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. Affidavit of BRS candidates directly on stamp paper

काय लिहिलं शपथ पत्रात..

उमेदवारांनी शपथपत्रांमध्ये गावविकास करण्याची शपथ घेतली.गावात पाण्याची समस्या आहे.ही समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. सोबतच गावातील अंतर्गत रस्त्याची निर्मिती करणार,गावाला डुक्कर मुक्त करणार, नाली, कचराकुंडीचे बांधकाम करणार असं शपथपत्रात त्यांनी लिहून दिल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular