Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्र राज्य'डी लिस्टिंग' विरोधात आदिवासी समाज उतरला नागपूर विधान भवनावर् हजारोच्या संख्येने

‘डी लिस्टिंग’ विरोधात आदिवासी समाज उतरला नागपूर विधान भवनावर् हजारोच्या संख्येने

Adivasi community marched in thousands at Nagpur Vidhan Bhavan against de-listing

चंद्रपूर :- दिनांक 15/12/2023 रोजी डी -लिस्टिंग तथा आदिवासी समाजाच्या मागण्या घेऊन आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर उतरला.
भारत भर आदिवासी विरुद्ध आदिवासी लढविण्याची भूमिका घेऊन मनुवादी सरकार सातत्याने कार्य करीत आहे. मणिपूर चा मुद्दा हा सुद्धा त्याचाच एक प्रकार आहे व सुरजागड येथील आदिवासी समाजाच्या जमिनीवरील खनिज उत्खनन हे जर गांभीर्याने बघितले तर ही डी लिस्टिंग नेमकी कशासाठी होत आहे, ज्यात आदिवासी मधील आदिवासी लोकांतील धर्मांतरण पुढे करून देशाची अर्थव्यवस्था ही खनिज संपतीतूनच सावरल्या जाऊ शकते. हा कुटील डाव आदिवासी समाजाला समजून आल्याने, केवळ आदिवासी समाजाकडे असलेल्याच जमिनी सरकारला बडकवायच्या आहेत म्हणून त्याविरुद्ध विविध आदिवासी संघटनानी एकत्र येऊन हिवाळी अधिवेशनावर आदिवासी जन आक्रोश मोर्चा काढला.व रस्त्यावर येऊन डी लिस्टिंग विरोधात सरकारला घाम फोडण्याचे काम केले.

ह्या मोर्चात गोंडवाना गणतंत्र पार्टी,ऑल इंडिया एमपाईज फेडरेशन, आदिवासी परधान समाज संघ, बिरसा क्रांती दल, मूलनिवासी मुक्ती मंच तथा आदी संघटना सामील होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular