Action plan on illegal OYO rooms, notice to OYO director
चंद्रपूर :- नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत शहरातील अवैध ओयो रुम्स आणि हॉटेलवर कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना केल्या होत्या. त्यानंतर मनपा प्रशासन अॅक्शन मोडवर असून शहरातील अवैध ओयो रुम्सला नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवैध ओयो चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. Action plan on illegal OYO rooms, notice to OYO director
चंद्रपूरमध्ये अवैध ओयो रूम्स हॉटेल्सचा सुळसुळाट झाला आहे. विशेषतः चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, अष्टभुजा वार्ड, बल्लारशा बायपास रोड, बाबुपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओयो रूम्स, हॉटेल्स अवैधपणे सुरू आहेत. या ओयो रूम्स, हॉटेल्समध्ये अनेक गैरप्रकार घडत असल्याबाबत स्थानिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच अनेक ओयो रूम्स, हॉटेल्स नजूलच्या जागेवर किंवा इतर सरकारी जमिनीवर विना परवानगी बांधले गेले आहेत. तसेच, हॉटेल सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे लॉजिंग व बोर्डिंगचे परवाने स्थानिक प्रशासनाकडून घेणे आवश्यक आहे. परंतु चंद्रपूर शहरातील सुमारे ९०% ओयो रूम्स हे सदर परवाने न घेताच सुरू आहेत. यामुळे शासनाला होणारा महसूल बुडत आहे. After MLA Kishore Jorgewar’s suggestion, municipal council on action mode
प्रचलित नियमानुसार हॉटेल्समध्ये २४ तासांचे आरक्षण असते, परंतु ओयो रूम्समध्ये तासांनुसार रुम्स भाड्याने देण्यात येत आहेत. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अनुचित प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या हॉटेल्समुळे अनेक गैरव्यवहार, अपराध आणि सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.
याबाबतच्या अनेक तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांना स्थानिक नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून पाठविल्या असता आमदार किशोर जोरगेवार यांनी याची तात्काळ दखल घेत नियमबाह्य सुरू असलेले ओयो रुम्स आणि हॉटेलवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवार यांना दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाच्या वतीने अशा ओयो चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून बांधकाम परवाने आणि व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.