Action of execution taken against 4 serial criminals in Chandrapur district Chandrapur District Police Force active
चंद्रपूर :- आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झाला असुन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदशीखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर जिल्हात शांतता अबाधीत राखण्याकरीता चंद्रपूर जिल्हयातील शरीरा विरूद्ध व मालमत्ते विरूद्धचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्या सबधाने पोलीस अधीक्षक यांनी आदेश पारीत करताच चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शुभम अमर समुद वय 26 वर्षे रा.पंचशील वार्ड, चंद्रपूर यानंतर रामनगर पोलीस स्टेशन येथील शारूख नुरखा पठाण वय 29 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ, चंद्रपूर तसेच नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय 31वर्षे रा.लुंबीनी नगर बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर यांना या आठवडयामध्ये तसेच पोलीस स्टेशन वरोरा येथील मोहन केशव कुचनकर, वय 25 वर्षे, रा.चिरघर लेआऊट, वरोरा जि.चंद्रपूर यास मागील आठवडया मध्ये कलम 56 (1)(अ) (ब) म.पो.का. अन्वये चालु महिण्यात असे एकूण 4 इसमांना 6 महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात नाओमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, महेश कोंडावार पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोलाची कामगीरी बजावून आतापर्यंत नमुद इसमांना 6 महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.