Monday, June 16, 2025
HomeChief Ministerकोल्हापुरातील विशालगड हिंसाचारा विरोधात तात्काळ कारवाई करा

कोल्हापुरातील विशालगड हिंसाचारा विरोधात तात्काळ कारवाई करा

Take immediate action against the accused in Vishalgad violence in Kolhapur

चंद्रपूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड परिसरात अतिक्रमणा च्या नावाखाली झालेल्या हिंसाचार आणी गजापूर गावातील नागरिकांवर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत युवा नेते कादर शेख यांनी निवेदनद्वारे केली आहे.

दिनांक 14 जुलै 2024 रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्यातील विशाळगड परिसरात अतिक्रणाच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने विशाळगडावरील विशिष्ट ठिकाणी जमावाने केलेल्या हिंसाचार, जाळपोळ तसेच स्थानीक गजापुर गावातील लोकांच्या घरावर आत्मघाती हल्ले, लहान मूल, महिलांवर अत्याचार या सर्व घटनेचा आम्हीं जाहीर निषेध करत, विशाळगड आणि तेथील समस्याचें काही प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित असून त्यावर कोणत्याच प्रकारचे अंतिम निर्णय झालेले नसून अशा परिस्थितीत जमावाला हिंसांचारासाठी प्रोत्साहित करणे, त्या परिसरातील विशेषतः एका समुदायाच्या लोकांवर हल्ले करने त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करने, ही घटना पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी असून ही घटना महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण करणारी आहे.

त्यामुळे तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या अत्याचारात सहभागी असलेल्या आणि या जमावाला हल्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनेवर तत्काळ करवाई व्हावी तसेच विशाळगड जवळ असणाऱ्या गजापूर येथील वस्तीवर जमावाकडून करण्यात आलेल्या जीवघेणा हल्लातील दोषींवर तात्काळ कठोर शिक्षा व्हावी तसेच या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या विशाळगड मधील धार्मिक स्थळ तसेच गजापूर गावातील लोकांवर व त्यांच्या मालमत्तेची तोडफोड, जाळपोळ याची नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत शासनाकडून तात्काळ देण्यात यावी तसेच विशाळगड भागातील त्या परिसराला पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली.

यावेळेस सामाजिक कार्यकर्ता जागृत मुस्लिम विकास मंचाचे अध्यक्ष सय्यद हाजी हारून, अधिवक्ता आरजू सय्यद, ताज कुरेशी, साजिद शेख, शोएब शेख आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular