Chandrapur crime news, Accused of robbing gold by telling bank employees arrested within 24 hours; Action by local crime branch चंद्रपूर :- बँक अधिकारी असल्याचे बतावणी करून शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट व सोने गहाळ Gold Robbing करणाऱ्यांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने Lcb Chandrapur अवघ्या 24 तासात आरोपी रामराव भिमराव ढोबळे, वय 51 वर्ष रा. तीवसा, ता. तीवसा, जिल्हा अमरावती याला नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून अटक केली आहे, यात आरोपींची दुचाकी जप्त करण्यात आली. Accused of robbing gold by telling bank employees arrested within 24 hours ; Action by local crime branch
वरोरा तालुक्यातील येन्सा येथील मंजुळाबाई नथ्थुजी झाडे वय ६५ वर्ष या आपल्या घरी असतांना दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दोन अनोळखी व्यक्ती घरी येऊन बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेमार्फत 1 लाख 40 हजार रुपये व बैलगाडीसाठी 3 लाख रुपये मंजुर झाले आहेत अशी बतावणी करून त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर 22 हजार रुपये नगदी भरावे लागतील म्हणून फिर्यादीकडील सोन्याची पोत व कानातील बिया असा एकुण 38 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आरोपीतांनी फिर्यादीची फसवणुक करून सोबत घेवून पळून गेले याचा वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. Accused of robbing gold by telling bank employees arrested within 24 hours ; Action by local crime branch
त्याच दिवशी दुपारच्या दरम्यान त्याच आरोपींनी वरोरा तालुक्यातील मौजा भटाळी, पोलीस स्टेशन शेगांव हद्दीत त्याचप्रकारचा आणखी दुसरा गुन्हा केला, त्याची तक्रार शेगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पो. नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनोद भुरले व पोलीस स्टाफ यांना सदर आरोपींचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले.
सदर अधिकारी व कर्मचारी यांनी कौशल्यपूर्ण तपास करून गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता रामराव भिमराव ढोबळे, वय ५१ वर्ष रा. तीवसा, ता. तीवसा, जिल्हा अमरावती या आरोपीने आपल्या साथीदाराच्या सहकार्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
गोपनिय बातमीदाराकडून तसेच गुणवत्तापुर्वक तपास करून आरोपी रामराव भिमराव ढोबळे यास नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मौजा केळवड येथून ताब्यात घेवून विचारपुस केली असता वरील दोन्ही गुन्हे आरोपीने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने केल्याचे कबुल केले.
आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली होन्डा शाईन गाडी जप्त करण्यात आली असतू सदर आरोपीचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता, आरोपीवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजले. Accused of robbing gold by telling bank employees arrested within 24 hours; Action by local crime branch (Lcb)
सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधु, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. धनराज करकाडे, नापोशि. चंदु नागरे, प्रशांत नागोसे, दिनेश आराळे तसेच पोस्टे सायबर, चंद्रपुर यांचे सहकार्याने केली असून आरोपींना पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन, वरोरा येथे ताब्यात देण्यात आले.