Accident, Surjagad Haiva crushed two-wheeler: one died on the spot
कोठारी :- बल्लारशहा – कोठारी मार्गावर दि 11 मे शनिवारला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान हायवाने दुचाकीस्वारास कोठारी नाल्याजवळ चिरडल्याले असून या भीषण अपघातात गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. Terrible Accident
लिखितवाडा येथील प्रेमदास छत्रपती सरवर वय 22 वर्ष व तारडा येथील मयूर नागोसे दोघेही मित्र बल्लारशाह येथील बॉटनिकल गार्डन Botanical Garden पाहायला गेले असता परत येत असताना कोठारी पुलाजवळ लोह खनिज भरलेला हायवा व MH 34 BL 4039 दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक जोरदार असल्याने प्रेमदासचा जागीच मृत्यू झाला. Unfortunate incident
मृतक प्रेमदास याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार असून कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा असल्याने गावात शोककळ पसरली आहे.
पुढील तपास कोठारीचे ठाणेदार आशिष बोरकर करीत आहे.
दिवसागणिक Surjagad सुरजागड वाहतूक जीवघेणी ठरत असून नागरिकांच्या जीवावर उठली आहे.यापूर्वी अनेक अपघात झाले असून अनेकांचा जीव जाऊन कुटुंब उध्वस्त झाले आहेत.
यावर शासनाने प्रतिबंध करणे अत्यावश्यक झाले आहे, अन्यथा भविष्यात अश्या घटना घडून घराबाहेर निघणाऱ्या व वाहन चालवीणाऱ्या नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होणार आहे.