Sunday, March 23, 2025
HomePoliticalकार्यक्रमातून नाही तर कृतीतून शिवाजी महाराज अंगीकारा - डॉ. अशोक जिवतोडे ;...

कार्यक्रमातून नाही तर कृतीतून शिवाजी महाराज अंगीकारा – डॉ. अशोक जिवतोडे ; शिव जयंतीच्या विविध कार्यक्रमात डॉ. अशोक जीवतोडे यांचा सहभाग

Accept Shivaji Maharaj not by program but by action – Dr.  Ashok Jivatode ; In various programs of Shiv Jayanti Participation

चंद्रपूर :- राजे छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. महाराष्ट्रातील मनामनात स्वाभिमान, स्वातंत्र्य व स्वराज्य जागविले. त्यांनी त्यांच्या जीवनकार्यातून व राजकीय प्रशासन शैलीतून आदर्श कार्यपध्दती रुजविली. त्यांचा जीवनपट तरुणांनी आवर्जून अभ्यासावा. रोज किमान अर्धा तास शिवचरित्राचे वाचन करावे व कार्यक्रमातून नाही तर कृतीतून शिवाजी महाराज अंगीकारा, असे प्रतिपादन डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले.

विविध ठिकाणी झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी सहभाग नोंदवून उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले व मिरवणुकीत सहभागी झाले.

स्थानिक शामनगर, बंगाली कॅम्प येथील श्री.जगदंब शिव जन्मोत्सव सोहळा २०२४ येथे आयोजित राजे छत्रपत्री शिवाजी महाराज जन्मोत्सवात प्रमुख उपस्थिती स्वरूपात डॉ. अशोक जीवतोडे यांनी मार्गदर्शन केले. व शिवजन्मोत्सव निमित्त निघालेल्या मिरवणुकीला झेंडा दाखवून सुरवात करून दिली.

स्थानिक बाबुपेठ येथील हींगलाज भवानी मंदिर पटांगणावर आयोजित शिवसंकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारा शिवजयंती निमित्त विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले गेले. राजे छत्रपती शिवाजी महाराज व श्रीरामाच्या प्रतिमेची शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वरोरा-भद्रावती विधानसभेअंतर्गत नंदोरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अशोक जीवतोडे होते. यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषण केले.

या विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात देवराव भोंगळे, राहुल पावडे, ऍड. सारिका संदुरकर, सचिन संदूरकर्, डॉ कूपरणे, वरभे सर, आकाश ठूसे, संदीप आगलावे, सौ. चांदेकर, तुषार मोहूर्ले, सुभाष आदमाने, सोनकुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नंदोरी येथे झालेल्या कार्यक्रमात नंदोरीचे सरपंच मंगेश भोयर, प्रवीण ठेंगणे, श्रीमती उषाताई लांबट, सौ. आश्लेषा भोयर, धनराज विरुटकर, अमित कुसनाके, भानुदास ढवस आदी मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular