ABVP protests in Chandrapur against the Sandeshakhali incident
चंद्रपूर :- पश्चिम बंगाल येथील संदेशखाली मध्ये राज्य सरकार संरक्षित अपराध्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या महिला अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चंद्रपूर येथील जटपुरा गेट जवळ तीव्र स्वरूपाची निदर्शने देऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा.राष्ट्रपतींना निवेदन देत दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. ABVP protest
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नमूद केलेल्या निवेदनानुसार गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगाल येथील परगना जिल्ह्याच्या संदेशखाली क्षेत्रात महिलांशी लैंगिक अत्याचार होत असून त्यांच्या सामूहिक अस्मितेला संपवण्याचा आणि महिलांच्या कुटुंबाचा सुद्धा छळ केल्या जात आहे. मात्र पश्चिम बंगाल सरकार या क्रूर अपराध्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेची गंभीर स्वरूपात निंदा व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून बळजबरी द्वारे हिंदू परिवारातील नाबालिग कन्या आणि महिलांना चिन्हित करून त्यांचे भयपूर्वक अपकरण करून सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात घेऊन जात असल्याचे प्रकरणे समोर आल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.
पश्चिम बंगाल सरकारच्या संलिप्ततेला लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी विशेष हस्तक्षेप करावा. सर्व प्रकरण देशविरोधी असल्याने संदेशखाली प्रकरणाची उच्च स्तरीय तपासणी केंद्रिय संस्थांमार्फत करण्यात यावी आणि दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशा विविध संवेदनशील मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहे. मंगळवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी विभाग संयोजक वैदेही मुडपल्लीवार, जिल्हा संयोजक पियुष बनकर, महानगर मंत्री आदित्य गचकेश्वर, सह मंत्री वंशीता कुकडे, विद्या मेश्राम, पयल तिखारे, श्वेता तडसे, पायल मलवडे, भुषण डफ, अमोल मदने, ओंकार सायंकार, प्रेम गाठे, अनुभव नामोजवार, यश बक्षी, शंतनु कातोरे, पियुष दारवनकर, शंतनु देशपांडे, इत्या. कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संखेत उपस्थित होते.