Abolish oppressive conditions in the post of Mumbai Municipal Corporation Executive Assistant (Clerk) – MLA Kishore Jorgewar The demand was made after meeting Chief Minister Eknath Shinde.
चंद्रपूर :- मुंबई महानगरपालिका आस्थापनावरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, एकूण 1 हजार 846 पदांची भरती होणार आहे. मात्र, या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आणि पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी या जाचक अटींवर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे त्या रद्द करण्याची मागणी MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. Abolish oppressive conditions of recruitment
मुंबई महानगरपालिका आस्थापनावरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, एकूण 1846 पदांची भरती होणार आहे. यात राज्यभरासह चंद्रपूरातील उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. मात्र, प्रचलित पदभरतीमध्ये या प्रकारच्या अटींचा समावेश नसतो. अशा जाचक अटींमुळे साधारणतः २ ते ३ लाख उमेदवारांना पदभरती परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून, या अटीमुळे अनेक युवक-युवतींसाठी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. जाहीर केलेल्या जाहिरातीत उमेदवाराने दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आणि पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. सदर अट अन्यायकारक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, आणि या बाबत अनेक विद्यार्थ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन सदर अट तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, सदर प्रकरण तपासून कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्त यांना दिले आहेत.