Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeEducationalजलसंधारण अधिकाऱ्यांची परीक्षा रद्द करा, दोषींवर कठोर कारवाई करा - राजू कुडे,...

जलसंधारण अधिकाऱ्यांची परीक्षा रद्द करा, दोषींवर कठोर कारवाई करा – राजू कुडे, आप

Abolish examination of water conservation officers, take strict action against culprits – Raju Kide, AAP

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या रोजगार भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. अमरावती येथे 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या जलसंधारण अधिकाऱ्यांची water conservation officers परीक्षेत विद्यार्थ्यांकडे उत्तर पत्रिका आढळल्याने खळबळ उडाली, या गैरप्रकारामुळे स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी या गैरप्रकाराबाबत तात्काळ कारवाईची मागणी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

“जलसंधारण अधिकाऱ्यांची परीक्षा तात्काळ रद्द करून परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर नवीन कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी तसेच TCS आणि IBPS च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा MPSC च्या माध्यमातून घ्यावी आणि परीक्षा शुल्क कमी करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी युवा जिल्हाउपाध्यक्ष विशाल माने, सुमित हस्तक, युवा संघटन मंत्री अनुप तेलतूमडे, युवा शहर अध्यक्ष महेश ननावरे, शुभम पाचभाई, ओम प्रकाश निषाद, प्रीतम कुंभारे, देविदास कोवे, शंकर सिडाम, भीमराज बागेसर, अनुज चव्हान, रणजित बोरकुटे, अक्षय चिंचोलकर तसेच मोठ्या प्रमानात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

कुडे यांनी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर टीका करताना म्हटले की, “या संस्था विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. गैरप्रकारामुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करतो.”

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular