Tuesday, March 25, 2025
HomeLoksabha Electionअरविंद केजरीवालांना जामीन मिळाल्याने बल्लारपूरात जल्लोष

अरविंद केजरीवालांना जामीन मिळाल्याने बल्लारपूरात जल्लोष

AAP workers rejoice in Ballarpur after Arvind Kejriwal gets bail

चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आप चे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Delhi CM Arvind Kejriwal यांना मद्य घोटाळ्याचे आरोप करून अटक करण्यात आली होते. परंतु आम आदमी पक्षाचे गढ असलेल्या दिल्ली व पंजाब मध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी केजरीवाल यांची जामीनावर सुटका झाल्याने आम आदमी पक्षाच्या देशभरातील कार्यकर्त्यात ऊर्जा संचारल्याचे दिसून येत आहे. अशीच ऊर्जा बल्लारपूर शहरातील आम आदमी पक्षाला देखील मिळाल्याचे दिसून आले.

बल्लारपूर शहरातील बस स्थानक ते नगरपरिषद चौकापर्यंत पक्षातर्फे आतिषबाजी करीत बॅन्डबाजाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करीत सर्वाना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

अत्यंत उत्साहात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष देतांना दिसले आणि शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी केजरीवालांची जमानत म्हणजे बाजप भाजपच्या पतनाची सुरूवात आहे असे म्हटले.

यावेळेस बल्लारपूर शहरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular