Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomePoliticalआम आदमी पक्षातर्फे नळबील दहन आंदोलन

आम आदमी पक्षातर्फे नळबील दहन आंदोलन

Aam Admi Party’s Water tap bill burning movement

चंद्रपूर :- बल्लारपूर शहरातील जनता पाण्याच्या अवाढव्य बील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी काराभारामुळे खुपच त्रस्त आहे यामुद्द्याला हेरून आम आदमी पक्षातर्फे AAP आज दिनांक 4 मार्च 2024 रोजी शहरातील सरकारी दवाखान्यासमोर नगरपरिषद चौकात आम आदमी पक्षातर्फे धरना आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मोठ्या संख्येने शहरातील समस्याग्रस्त नागरिक तसेच पक्षाचे जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन जनतेने आक्रोश व्यक्त केला व अवाढव्य नळ बिलाचे दहन करण्यात आले.

यासह शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी पाणी बिलांच्या संदर्भातील समस्या लवकर निकाली लावा तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कार्यपद्धती सुधारा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे बंद करा, त्याऐवजी शिक्षित युवकांना रोजगार द्या असे आवाहन केले.

जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांच्या अध्यक्षतेत एक मागणीपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले. ज्याचे उत्तर तीन दिवसात मिळाले नाही तर आम आदमी पक्षातर्फे साखळी उपोषण केले जाईल अशी इशारा ही पक्षातर्फे देण्यात यावेळी देण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular