Aam Aadmi Party’s road stop movement
National Highway closed for almost half an hour
Form of camp at protest site
चंद्रपूर :- शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर बल्लारशाह राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालल्याने त्याठिकाणी अपघातांची मालिका थांबन्याचे नाव घेत नाही आहे.
याच महामार्गांवर अष्टभुजा बाबूपेठच्या मध्यभागी रेल्वे ओवर ब्रिजचे काम टोल कंपनीला पूर्ण करायचे असून बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने आपली नैतिक जिम्मेदारी सोडून जनतेकडून सर्रासपने टोलटॅक्स वसुली करणाऱ्या विसापूर येथील WCBTRL कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून भविष्यात होणाऱ्या अपघाताची जिम्मेदारी टोल कंपनीने स्वीकारावी व तात्काळ पुलाचे काम सुरू करावे या मागणी करिता आज दिनांक 20/02/2024 ला अष्टभूजा जवळील रेल्वे ओवर ब्रिज वरती चक्क अर्धा तास रास्ता रोको आंदोलन आप चे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.त्यांनी सांगितले कि जर या 15 दिवसात प्रशासनाने यावर कठोर कार्यवाही केली नाही तर आम आदमी पार्टी तर्फे या पेक्षा ही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या वेळी देण्यात आला रास्ता रोको करना-या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
यावेळेला आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, किसान आघाडीचे दीपक बेरशेटीवार, जिल्हा सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योतीताई बाबरे महिला शहर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख,बल्लारपूर शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार, वाहतूक जिल्हाध्यक्ष महेंद्र धुमने, वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष संगम सागोरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मनीष राऊत, जिल्हा युवा संघटन मंत्री अनुप तेलतुबडे, शहर उपाध्यक्ष सुनील सतभय्या, क्रिश कपूर, मंगला रेंभनकर, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, सुजित चेटडगुलवार, राजू मोहुर्ले, हरिदास पिंगे, अनुज चव्हाण, गुड्डू मेश्राम, विशाल झामरे, राजू यादव, इत्यादी तसेच बाबुपेठ ची जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.