Aam Aadmi Party’s “Ekta Ki Mashal” festival was held in chants of Jai Bhim, Jai Constitution
चंद्रपूर :- रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर शहरात आम आदमी पक्षातर्फे सलग तिसऱ्यांदा संविधान दिन आणि पक्ष स्थापना दिवस शगुन लॉन समोरिल खुल्या मैदानात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. Constitution Day and AAP Party Foundation Day
शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा संघठनमंत्री नागेश्वर गंडलेवार यांच्या मोठ्या पाठबळाने सुरू झालेल्या संविधान दिन व एकता कि मशाल महोत्सवात हजारो नागरिकांची गर्दी बघायला मिळाली.
कार्यक्रमाची सुरूवात नगरपरिषद चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मानवंदना करून जनतेत ऐक्य भावना रुजविण्याच्या उद्देशाने नगरपरिषद चौकातून कार्यक्रम स्थळापर्यंत ढोल ताशांच्या गजरात तसेच ‘जय भीम जय संविधान’ च्या जयघोषात ‘मशाल यात्रा’ काढण्यात आली. यानंतर कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर विविध धर्मांच्या धर्मगुरूंच्या हस्ते मोठी मशाल पेटविण्यात आली. हि मशाल म्हणजे सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी “एकता कि मशाल” व हा महोत्सव म्हणजे “एकता की मशाल महोत्सव”. या महोत्सवात घटम वादक तेजस खरात व 15 वर्षीय सप्त खंजेरीवादक कीर्तनकार कु. तुलसीताई हिवरे यांच्या संविधान प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास पक्षाचे राज्य संगठन मंत्री भूषण ढाकुलकर जी, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, उपाध्यक्ष सुरजभाऊ ठाकरे,संघठन मंत्री भिवराज सोनी, कोषाध्यक्ष सरफराज शेख, चंद्रपूर महानगराध्यक्ष योगेश गोखरे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच शहर कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमास जनतेतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हजारोंच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती दिसली.