Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्र राज्यईपीएस 95 संघर्ष समितीच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचे समर्थन

ईपीएस 95 संघर्ष समितीच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचे समर्थन

Aam Aadmi Party supports the movement of EPS 95 Sangharsh Samiti

चंद्रपूर :- देशभरातील ईपीएस 95 पेंशन धारकांच्या EPS 95 pension holders  हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला चंद्रपुरातील आम आदमी पार्टीने समर्थन दिले आहे. आज (दि. 12) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. AAP 

ईपीएस 95 पेंशनधारकांना केवळ 300 ते 3 हजार रूपयापर्यंत पेंशन मिळते. त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. अशा स्थितीत सन्मानपूर्वक जगण्यास त्यांना अडचण निर्माण होत आहे. या सर्व सेवानिवृत्त पेंशनधारकांना योग्य न्याय मिळावा यासाठी आम आदमी पार्टी नेहमीच त्यांच्यासोबत आहे तसेच 30 जानेवारीला दिल्ली मध्ये होणाऱ्या आंदोलनात आम आदमी पक्शाचं समर्थन राहणार असून संसदेमध्ये सुध्दा हा विषय आप चे खासदार यांना मंडण्याकरिता आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आप चे नेते सुनील मुसळे यांनी म्हटले आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, उपाध्यक्ष सुनिल सदभैया, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, अनुप तेलतुंबडे, सुजित चेडगुलवार ईतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular