Sunday, April 21, 2024
Homeधार्मिकसर्व धर्मीयांचा आदर, समानतेचा संदेश. दसऱ्याच्या दिवशी मुस्लिम समाजाने केले हिंदू बांधवांचे...

सर्व धर्मीयांचा आदर, समानतेचा संदेश. दसऱ्याच्या दिवशी मुस्लिम समाजाने केले हिंदू बांधवांचे स्वागत.

A message of respect for all religions, equality.  On the day of Dussehra, the Muslim community welcomed the Hindu brothers.                        राजुरा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा, विजयादशमी सण, वाईटावर चांगल्याचा विजयाचा सण राजुरा शहरात सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

दरवर्षी हिंदू मुस्लिम सणांमध्ये राष्ट्रीय एकाची भावना निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने राबविण्यात येतात त्याचेच एक प्रतीक म्हणून यावर्षीही विजयादशमी निमित्त सर्व बांधवांचे मुस्लिम बांधवांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. जाती धर्माच्या भिंती थोडी समानतेचा व माणुसकीचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून प्रशंशा होत आहे. माणुसकीचा सर्वात मोठा धर्म जोपासित माणसाला प्रेम देण्याचं काम मुस्लिम बांधवांनी आपल्या उपक्रमातून केले आहे. समाजातील एकात्मता व सर्व धर्माबद्दल आदर यातून व्यक्त होत असल्यामुळे सर्वांनी अतिशय आपुलकीने गळाभेटी घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात.

या वेळी शहरात दहशतवाद आणि भ्रष्टाचाराच्या राक्षसी पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राजुरा मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वांना विजयादशमी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
राजुरा नाका क्र. 3 रोजी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाबपुष्प देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्यात.

यावेळी सय्यद शहजाद अली, नसीरुल्ला बेग, बाबा बेग, मसूद अहमद, निजाम बुखारी, एजाज अहमद, रकीब शेख, शाहनवाज कुरेशी, मतीन कुरेशी, शाहबाज कुरेशी, मोहम्मद वकील सलाम चाऊस, कबीर कुरेशी, मोहम्मद जाविद, सय्यद शाकीर, सय्यद शाहीर अब्दुल मुखत्यार, सय्यद नुरू, मोहम्मद लायक, मोहम्मद जुनैद, शोहेब शेख, नाफे , अवेस कुरेशी, तौफीक शेख फैज कुरेशी आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular