9 lakh worth of illegal domestic and foreign liquor seized along with a four-wheeler
चंद्रपूर :- सावली पोलीस स्टेशन हद्दीतील मोखाळा येथे ह्युंदाई आय 20 चारचाकी वाहनात अवैधरित्या वाहतुकीसाठी साठवून ठेवलेली देशी, विदेशी दारू व बियर असा 1,25,360 रुपये व चारचाकी वाहन 8,00000 रुपये असा एकूण 9,25,000 रुपयांचा मुद्देमाल LCB Chandrapur स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करण्यात आला असून नरसिंग उर्फ अन्ना गनवेनवार याला ताब्यात घेण्यात आले. illegal domestic and foreign liquor seized
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हर्षल एकरे व पोलीस स्टॉफ सावली परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, विक्की सुरेश गोडसेलवार, वय 27 वर्ष, व्यवसाय आर.ओ. प्लॅन्ट, रा. मोखाळा, ता. सावली हा त्याचे घरा समोर ह्युंदाई आय 20 कंपनीची चारचाकी वाहन कमांक एम. एच. 34 बी. एफ. 3771 मध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकी करीता साठवुन ठेवतो यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पाठकाने धाड टाकत वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये 1500 नग देशी दारू, 24 नग रॉयल स्टॅग कंपनीची Royal Stag प्रत्येकी 2000 एम.एल. मापाने भरलेली विदेशी दारू, 100 नग रॉयल स्टैंग कंपनीची RS प्रत्येकी 90 एम.एल. मापाने भरलेली विदेशी, 20 नग रॉयल कंपनीची प्रत्येकी 375 एम.एल. मापाने भरलेली विदेशी दारू, 24 नग आयकॉनीक वाईट कंपनीची Iconic White विदेशी दारू प्रत्येकी 180 एम.एल. मापाने भरलेली तसेच 48 नग हायवार्ड 5000 कंपनीची Hyward 5000 बियर प्रत्येकी 500 एम.एल. मापाने भरलेली असा एकुण 1,25,360/- रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली ह्युंदाई आय 20 कंपनीचे चारचाकी वाहन Hyundai I 20 किमंत 8,00000/- रूपये असा एकुण 9,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Crime News
वरील अवैध देशी विदेशी दारू ही नरसिंग उर्फ नरसिंग अन्ना गनवेनवार, रा. मुल, जि. चंद्रपुर याचा असल्याचे विक्की गोडसेलवार याने सांगितल्यावरून नमुद आरोपीस पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन सावली यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, जयंता चुनारकर, रजनिकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.