Thursday, February 22, 2024
Homeआमदारदीक्षाभूमिच्या विकासाकरिता उच्च अधिकार समितीची 56 कोटी 90 लक्ष निधीच्या प्रस्तावाला मंजूरी...

दीक्षाभूमिच्या विकासाकरिता उच्च अधिकार समितीची 56 कोटी 90 लक्ष निधीच्या प्रस्तावाला मंजूरी ; आमदार किशोर जोरगेवार यांचा पाठपुरावा, प्रस्ताव अंतिम टप्यात

56 Crore 90 lakh fund proposal of High Authority Committee approved for Dikshabhoomi development;  Follow-up by MLA Kishore Jorgewar, proposal in final stage

चंद्रपूर :- चंद्रपूरातील पवित्र दीक्षाभूमीचा Diksha-bhoomi सर्वसमावेशक विकास करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार Mla Kishor Jorgewar यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात त्यांना यश येत असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी उच्च अधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला असुन आता सदर कामाचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर Dr. Babasaheb Ambedkar यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दिक्षा दिली. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झालेला आहे. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली आहे. येथे देशभरातुन येणाऱ्या अनुयायांसाठी कसल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी समितीचे पदाधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर सत्ता परिवर्तन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही सदर मागणीचा पाठपूरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर येथील दिक्षाभुमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती.

दरम्यान त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या दिक्षाभुमी विकासासाठी उच्च अधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून सदर प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता पाठविला आहे. सदर प्रस्तावित निधी वित्त विभागाकडून मंजूर करत कामाला प्रशासकिय मान्यता देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने आमदार जोरगेवार यांचे अभिनंदन

दीक्षाभूमीच्या विकासकामाचा पाठपूरावा करुन पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाचे काम पूर्णत्वाकडे नेत असल्या बदल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-यांनी आज सोमवारी जनसंपर्क कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही चंद्रपूरच्या पवित्र दिक्षाभुमीच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे म्हटले आहे. यावेळी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक , सहसचिव कुणाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के, प्रा. दिलीप रामटेके आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular