Sunday, February 16, 2025
HomeCrimeदोन विविध कारवाईत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त ;

दोन विविध कारवाईत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त ;

41 lakhs in two separate operations of LCB seized।                                                                 Lok Sabha elections are over, the local crime branch is on action mode

★ निवडणुक संपताच स्थानिक गुन्हे शाखा अँक्शन मोडवर

चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी Loksabha Election संपताच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB Chandrapur पुन्हा एटिव्हपणे कार्यरत होत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेता Prohibited Flavoured Tobacco व अवैधरित्या जनावरांची (गोवंश) तस्करी Cattle smuggling करणाऱ्या दोन ट्रकचा पाठलाग करीत ताब्यात घेत जनावरांना मुक्त करीत एकूण 41,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तीन आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. Chandrapur Crime

23 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय बातमीदारा कडुन पो.स्टे. भद्रावती police station Bhadrawati हद्दीत मौजा घोडपेठ येथिल मुख्य चौकातील खर्रा व्यावसायिक महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू ची आपल्या घरात अवैधरित्या साठवणुक करुन विक्री करीत असल्याची माहीती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोजा घोडपेठ येथिल खर्रा व्यावसायिक सुमेध उर्फ समिर देवगडे यांस ताब्यात घेवुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरी अंदाजे किंमत 47,000 रु. चा सुंगधित तंबाखु आढळून आला. सदर गुन्हा पो.स्टे. भद्रावती येथे नोंद करुन मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पो.स्टे. भद्रावती यांचे ताब्यात देण्यात आले.

तसेच दिनांक 24 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास नागपुर – चंद्रपुर महामार्गाने दोन ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात अवैधरित्या जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करुन तेलंगाना राज्यात नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली येथिल एमआयडिसी चौकात नाकाबंदी केली असता अशोक लेलैंड कंपनिचे दोन ट्रक MH 34 AB 9001 व MH 34 AB 6202 हे संशयास्पदरित्या येतांना दिसुन आले नाकाबंदी Police blockade दरम्यान सदर वाहनांना थांबण्याचा इशारा केला असता, दोन्ही ट्रक नाकाबंदी मध्ये न थांबता भरधाव वेगाने घुग्घूस च्या दिशेने पळुन जात असताना सदर दोन्ही ट्रक चे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन मौजा चिंचाळा गावाजवळ थांबवुन वाहनांची पाहणी केली असता सदर दोन्ही ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त अवैधरित्या (गोवंश) जनावरांना गाडीत कोंबुन कत्तलीकरीता Telangana तेलंगाणा येथे घेवुन जात असल्याचे दिसुन आले.

दोन्ही ट्रकमध्ये एकूण 53 नग गोवंश जनावरे अंदाजे किंमत 20,60,000 रुपये, दोन ट्रक किं. 20,00,000 रुपये व दोन मोबाईल कि. 20,000 रुपये असा एकुण 40,80,000 (चाळीस लाख ऐंशी हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Local Crime Branch

दोन्ही ट्रक मधील आरोपी वसिम खान युनुस खान वय 19 वर्षे व फारुख खान गफ्फार खान वय 25 वर्षे दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथून असून हल्ली वार्ड नं. 4 गडचांदूर ता. कोरपना जि. चंद्रपुर यांचेवर कलम 429 भादवि, सहकलम 11 (1), (ड) प्रा. नि. वा. कायदा 1960, सहकलम 5 अ (1),5 ब.9.11 महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम 83,130/177, मोवाका अन्वये पो.स्टे. पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. पडोली यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular