Tuesday, March 25, 2025
HomeAgricultureगोंडपिपरी येथे 25 लाखांचे अनधिकृत बिटी बियाणे जप्त

गोंडपिपरी येथे 25 लाखांचे अनधिकृत बिटी बियाणे जप्त

25 lakh worth of unauthorized cotton Thieves BT seed seized at Gondpipari

चंद्रपूर :- जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवार दिनांक 23 मे रोजी रात्री 12 वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला 25 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे (चोर बिटी बियाणे) Unauthorized cotton Thieves BT seed  वाहतूक करताना बियाणे जप्त केले, यात 12.90 क्विंटल बियाणे किंमत 25.80 लक्ष रुपये, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण 30 लाख 86 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Agricultural Crime

अनाधिकृत चोर बेटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही. कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. Agriculture Department appointed Bharari Squad teams in the district and each taluk to control unauthorized seeds

मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते. शेतकऱ्यांना चोर बिटि विक्री करून फसवणूक केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग व पोलीस विभाग हे अलर्ट आहेत.

गोंडपिपरी पोलीस स्टेशन Gondpipari Police Station चे ठाणेदार रमेश हत्तिगोटे व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना दिनांक 23 मे रोजी रात्रौ 12 वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत वय (24) रा.अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे गाडी क्रमांक MH 34 M 8635 वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे 12.90 क्विंटल 25.80 लक्ष रुपये किमतीचे बियाणे सापडले. Cotton BT seeds, urea fertilizer and pick-up vehicle seized

संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.दि. (24) शुक्रवारी पहाटे 5 वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली.

कापसाचे अनधिकृत चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकअप चारचाकी वाहन असा एकूण 30 लाख 86 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत, विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, मुख्य गुणवंत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पंचायत समिती कृषि अधिकारी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, श्रावण बोढे, विवेक उमरे, पोहवा देविदास सुरपाम, मनोहर मत्ते, शांताराम पाल,  प्रशांत नैताम, पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular