150th birth anniversary of Chhatrapati Shahu Maharaj
Meritorious students felicitation ceremony
चंद्रपूर :- रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन (इंडिया) चंद्रपूर च्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा २६ जून २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता स्थानिक एन.डी.हॉटेल नागपूर रोड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे,त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज यांचा १५० वा जयंती महोत्सव सुद्धा सर्व चंद्रपूर येथील जनतेच्या साक्षीने संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम ॲड.राजस प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली होत असून या कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आ.सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale करणार आहेत, Meritorious students felicitation ceremony
अध्यक्षस्थानी रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन चे सल्लागार प्रतीक विठ्ठल डोर्लीकर असतील तर स्वागाध्यक्षपदी मा.सुधाकर अंभोरे राहणार.विद्यार्थांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मा.सुरेश बोरकर,एमपीएससी यूपीएससी मार्गदर्शक ६५८ रँक २०२३ तसेच मा.सुमित उर्कुडकर, मोटिवेशनल स्पीकर, वर्धा तर प्रमुख अतिथी मा.सोहेल राजा शेख, सामाजिक कार्यकर्ता, चंद्रपूर मा.ॲड.आशिष मुंदडा, विधितज्ञ चंद्रपूर उपस्थित राहणार आहेत. 150th birth anniversary of Chhatrapati Shahu Maharaj
ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला आपले नाव सत्करासाठी नोंदवायची असल्यास सक्षम पाथर्ड 8605152532 आणि सुमेधा खोब्रागडे 8668620402 यांच्याशी संपर्क साधून २४ जुन पर्यंत पाठवावे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शुभम शेंडे, हर्षल खोब्रागडे, नयन अलोणे, कपिल गणवीर, अभिजित तोतडे, अक्षय डांगे, अमोल बागेश्वर, प्रज्योत बोरकर, सुमेध साखरे, निवेदिता पूनवटकर, कोमल बोरकर, सहील जूनघरे, संगम शेलकर परिश्रम घेत आहेत.