Tuesday, March 25, 2025
HomeCrimeरेती तस्करीच्या तीन ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त

रेती तस्करीच्या तीन ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त

15 lakh worth of goods seized along with three tractors of sand smuggling: Action of Chandrapur local crime branch

चंद्रपूर :- शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वाहनगाव – बोथली परिसरात अवैध रेतीची तस्करी व वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टर ताब्यात घेत त्यातील 3 ब्रास रेती असा एकूण 15,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 3 ट्रॅक्टर चालक व दोघा ट्रॅक्टर मालक यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत पुढील कारवाईकरिता शेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. Sand Smuggling &Transporting

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर LCB Chandrapur यांचे पथक पो.स्टे. शेगाव येथे Petroling पेट्रोलिंग करीत असता दिनांक 28 एप्रिल रोजी काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतुक वाहनगाव – बोथली परीसरात करणार आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली, यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे 6.30 वाजताच्या दरम्यान वाहनगाव – बोथली रोडवर सापळा रचुन तिन वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्यांच्या दिशेने येताना दिसले, त्या तिन्ही ट्रॅक्टरला थांबवुन तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीची पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तिन ब्रास रेती आढळून आली. यावरून तिन्ही ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती मुरपार येथील हत्तीघाट येथुन चोरुन आणुन मौजा बोथली परीसरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले. Crime News
यावरून त्यांचेवर कारवाई करीत एकुण 3 ब्रास रेती अंदाजे किंमत 15,000 रुपये व 3 ट्रॅक्टर किं. 15,00,000/- रुपये असा एकुण 15,15,000/- रुपये (पंधरा लाख पंधरा हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करुन चालक सौरभ दत्तु दडमल वय 24 वर्षे रा. खडसंगी ता. चिमुर जि. चंद्रपुर, मनोज रमेश वानखेडे वय 34 वर्षे रा. शेडेगाव ता. चिमुर जि. चंद्रपुर, बंडु बापुराव चौधरी वय ३९ वर्षे रा. खडसंगी व मालक अनिल ज्ञानेश्वर मेश्राम रा. खडसंगी व सचिन ज्ञानेश्वर मेश्राम रा. खडसंगी यांचेविरुध्द पो.स्टे. शेगाव येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. शेगाव यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular