13-year-old Rohan Kumar missing
Appeal of city police
चंद्रपूर :- अंचलेश्वर गेटजवळ राहणारा 13 वर्षीय रोहन कुमार नवके दिनांक 9 मे रोजी सकाळी 6 वाजता सायकल घेऊन खेळायला गेला असता अजूनही परतला नाही, सदर मुलगा कोणाला आढळल्यास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. Missing
शहरातील अंचलेश्वर गेट जवळ राहणारी कविता अविनाश नवके व तिचे पती हे सकाळीच कामावर निघून गेले व त्यांची चारही मुले घरी झोपलेली होती. कविता रात्रौ 11 वाजता कामावरून घरी परत आली असता, तीन मुले हाजर होती पण मोठा मुलगा रोहनकुमार हा घरी दिसून आला नाही. तेव्हा तिने दुसऱ्या मुलगा साईकुमार यास विचारले असता, त्याने रोहनकुमार हा सकाळी 6 वाजताच सायकल घेवून खेळायला निघून गेला, आतापावेतो घरी परत आला नाही असे सांगितले. महिलेने पतीला फोनकरून माहिती दिली, त्यानंतर रोहनकुमारचा महाकाली मंदिर वार्डात, चंद्रपूर शहर, रेल्वे स्टेशन, बसस्टॉप व नातेवाइंकाकडे विचारपुस करून शोध घेतला असता कुठेही मिळून आला नाही.
त्यानंतर महिलेने चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन Chandrapur City Police Station येथे तक्रार दाखल केली.
मुलाचे वर्णन
रोहनकुमार अविनाश नवके वय 13 वर्ष, बांधा सळपातळ, रंग-सावळा, उंची अंदाजे 4 फूट, केस काळे, अंगात लाल रंगाची टी शर्ट व काळया रंगाचा नाईट पॅन्ट, पायात स्लिपर चप्पल, लाल रंगाची छोटी सायकल अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास सपोनि राहुल गुहे 7720036111 व पोउपनी विजय मुके 9923401065 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांनी केले आहे.