Sunday, April 21, 2024
HomePoliceवर्षभरात DJ ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी 10 दिवस जाहीर तर 5 दिवस...

वर्षभरात DJ ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी 10 दिवस जाहीर तर 5 दिवस राखीव

10 days public and 5 days reserved for use of DJ speakers and loudspeakers in a year

चंद्रपूर :- केंद्र शासनाच्या Sound Pollution ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5 (3) नुसार, ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक Loudspeaker and amplifier यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामाजिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यासाठी, सन 2024 करीता 10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले असून त्यापैकी 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतुगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, वर्षांमध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

हे आहेत सवलतीचे दिवस व सवलतीचे प्रयोजन :

शिवजयंती करिता 1 दिवस सवलत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (14 एप्रिल) 1 दिवस आणि ईद-ए-मिलाद करीता 1 दिवस, अनंत चतुर्दशी व गणेश उत्सवाकरीता (17 सप्टेंबर) इतर 2 दिवस असे एकूण 3 दिवस निश्चित, नवरात्रोत्सव व अष्टमीकरीता (10 व 11 ऑक्टोबर) 2 दिवस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन (16 ऑक्टोबर) 1 दिवस, 31 डिसेंबर 1 दिवस व 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.

राखीव ठेवण्यात आलेल्या 5 दिवसाच्या बाबतीत तसेच गणेश उत्सवाच्या व इतर 2 दिवसाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-यांकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular