Friday, April 19, 2024
HomeCrimeचंद्रपुरात 1 देशी कटटा, 5 जीवंत काडतुस जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची...

चंद्रपुरात 1 देशी कटटा, 5 जीवंत काडतुस जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 country gun, 5 live cartridges seized in Chandrapur
Action by local crime branch

चंद्रपूर :- जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणा-या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक, चंद्रपूर मुम्मका सुदर्शन व रिना जनबंधू अप्पर पोलीस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने LCB Chandrapur स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रपूर महेश कोंडावार यांच्या पथक अवैधरीत्या बाळगण्यावर माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते, मोहीमे दरम्याण पथकाला गोपनीय माहीती मिळाली कि, तुकुम तलाव, चंद्रपुर येथील के.जि.एन. पान सेंटर जवळ एक इसम आपले कमरेला गावटी बनावटीचे रिवॉल्वर लावुन उभा आहे. Crime News

सदर माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ रवाना होवुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली असता सदर ईसमाच्या कमरेला लागुन असलेल्या काळ्या बॅग मध्ये एक गावटी बनावटीचे रिवॉल्वर व त्यात वापरण्यात येणारे 05 नग जीवंत काडतुस आढळून आले.

सदर व्यक्तीचे नाव विचारून क्राईम रेकॉर्ड चॅक केले असता गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली.

सदर इसमाविरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपी जुबेर साहेबअली शेख, वय 20 वर्ष, रा. लालपेठ कॉलरी नं. 1, चंद्रपुर यांस पुढिल कायदेशीर कार्यवाहीकामी पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंदपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ, गोपाल आतकुलवार यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular